Sunday, November 7, 2010

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे भारत भेटीसाठी मुंबईत आगमन



अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे भारत भेटीसाठी मुंबईत आगमन
शनिवार, ६ नोव्हेंबर, २०१०

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे भारत भेटीसाठी शनिवारी दुपारी १२.५० वाजता मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरफोर्स वन या विशेष विमानाने आगमन झाले. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा या होत्या.

मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विमानतळावर ओबामा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच महाराष्ट्राची माहिती असलेले `कॉफी टेबल बुक` हे पुस्तक भेट दिले. यावेळी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद,अमेरिकेतील भारताच्या राजदूत मिरा शंकर, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी यांनीही राष्ट्राध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी विमानतळावर मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, सहमुख्य राजशिष्टाचार अधिकारी शैलेश बिजूर, वरिष्ठ अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment