
`स्लेव्हरी` हे पुस्तक माझ्यासाठी अमूल्य भेट - बराक ओबामा
शनिवार, ६ नोव्हेंबर, २०१०
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना शनिवारी हॉटेल ताजमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७३ मध्ये लिहिलेले स्लेव्हरी (गुलामगिरी) हे पुस्तक भेट दिले. त्यावेळी बराक ओबामा यांनी `ही आपल्यासाठी अमूल्य भेट असल्याचे` उद्गार काढले.
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्री. ओबामा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी श्री. भुजबळ यांनी बराक ओबामा यांची भेट घेऊन त्यांना हे पुस्तक दिले.
भारतातील सामाजिक चळवळीचे पहिले क्रांतिकारक महात्मा फुले यांनी १३७ वर्षांपूर्वी हे पुस्तक अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीविरुद्ध लढय़ासाठी योगदान देणार्यांना अर्पण केले आहे, हे वाचल्यानंतर बराक ओबामा यांनी भारावून जाऊन `हे पुस्तक माझ्यासाठी अमूल्य भेट आहे`, असे उद्गार काढले.
No comments:
Post a Comment