NEW TOWN DEVELOPMENT AUTHORITY
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी खालील कामांच्या मोहोरबंद निविदा बी-१ पध्दतीच्या नमुन्यात महाराष्ट्र शासनाच्या पी.डब्ल्यु.डी., मजीप्रा तसेच एम.ई.एस., सी.पी.डब्ल्यु.डी.,इ. पैकी कोणत्याही एका संस्थेचे/कार्यलयाचे योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत ठेकेदारांकडून मागवित आहेत.कोर्या निविदांचा नमुना प्राधिकरणातील कार्यकारी अभियंता यांचे कार्यालयातून दि. ०७/१०/२०१० ते दि. ०१/११/२०१० रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत देण्यात येतील. निविदा दिनांक ०४/११/२०१० रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. प्राप्त निविदा शक्य झाल्यास त्याच दिवशी उपस्थित ठेकेदारांसमक्ष दुपारी २.३० वाजता उघडण्यात येतील. कोणत्याही निविदा मंजूर करण्याचा अथवा सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे. निविदा उघडताना ठेकेदार हजर न राहिल्यास त्यांच्या अनुपस्थितीत निविदा उघडण्यात येतील व त्यानंतर कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच अटीयुक्त निविदा स्विकारली जाणार नाही. निविदा उघडण्याच्या दिंनाकापासून ९० दिवसांपर्यंत निविदेतील दर ग्राह्य धरण्यात येतील.निविदा स्विकृतीपत्र पाठविल्यानंतर ८ दिवसाचे आंत करारनामा करावा लागेल.निविदापूर्व बैठक दि. २६/१०/२०१० या दिवशी सकाळी ११.०० वाजता कार्यकारी अभियंता/मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात होईल.सदर बैठकीला ठेकेदार उपस्थित न राहिल्यास निविदेतील कोणत्याही बाबीवरील कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
अ.क्र | निविदा क्र. | कामाचे नाव | अंदाजित रक्कम रुपये | बयाणा रोख रक्कम रुपये | सूरक्षा अनामत रोख व देयकातून रुपये | काम पूर्ण करण्याचा कालावधी | कोर्या निविदा नमुन्याची किंमत रुपये | किमान वार्षिक उलाढाल रु. लक्षमध्ये | तत्सम कामाचा अनुभव रुपये लक्षमध्ये |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | बी-१/१० २०१०-२०११ | प्राधिकरणाच्या पेठ क्र. ३२ ए मध्ये १२ मी. व १५ मी. रुंद रस्त्यांचे काम. | १०१७०८३९/- | १०१८००/- | ४०६९००/- | १२ महिने | ५,०००/- | ७६.२८/- | ३०.५१/- |
सर्वसाधारण अटी
कोरे निविदा फाँर्म फी रोख स्वरुपात अभियांत्रिकी विभागाकडून देण्यात येणार्या चलनाव्दारे युनियन बँक आँफ इंडिया,आकुर्डी शाखा येथे भरावी लागेल,रक्कम स्विकृतीची बँकेची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते ३.३० व शनिवार सकाळी १०.३० ते १२.३० अशी आहे.व या वेळेतच निविदा फाँर्म फी चे चलन अभियांत्रिकी विभागाकडून देण्यात यईल. या वेळेनंतर आलेल्या निविदा मागणी अर्जाचा विचार केला जाणार नाही.
निविदा बयाणा रक्कम रोख स्वरुपात अभियांत्रिकी विभागाकडून देण्यात येणार्या चलनाव्दारे युनियन बँक आँफ इंडिया,आकुर्डी शाखा येथे भरावी लागेल,अन्य कोणत्याही स्वरुपात बयाणा रक्कम स्विकारली जाणार नाही.रक्कम स्विकृतीची बँकेची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते ३.३० व शनिवार सकाळी १०.३० ते १२.३० अशी आहे. सदर बयाणा रोख रक्कम भरणा चलन (मूळ) निविदा सादर करताना लिफाफा क्र. १ मध्ये सादर करणे आवश्यक आहे.
निविदा भरणे संदर्भातील अटी व शर्ती निविदा नमुना (फाँर्म) खरेदी करतेवेळी पुरविण्यात येतील. तसेच कार्यालयाच्या सूचनाफलकावर (नोटीस बोर्ड) त्या पहावयास मिळतील.सदरच्या अटी व शर्ती निविदाधारकावर बंधनकारक राहतील याची नोंद घ्यावी.
निविदा खरेदी करताना सादर करावयाच्या अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या छायांकित सत्य प्रती सादर करणे आवश्यक आहे. व विचारणा झाल्यास त्यांच्या मूळ प्रती अवलोकनार्थ सादर करणे आवश्यक आहे.
१. पी.डब्ल्यु.डी., मजीप्रा तसेच एम.ई.एस., सी.पी.डब्ल्यु.डी.,इ. पैकी कोणत्याही एका संस्थेचे/कार्यालयाचे विहित वर्गातील रजिस्ट्रेशन.
२. कामाच्या अंदाजपत्रकीय किंमतीच्या किमान २०% बँक साँलव्हन्सी प्रमाणपत्र.
३. व्हँट रजिस्ट्रेशन किंवा वर्क्स काँन्ट्रँक्ट रजिस्ट्रेशन.
४. गतवर्षातील आयकर विवरण.
५.कामाच्या स्वरूपाचे किमान ३०% किंवा त्याहून जास्त रकमेचे एक काम (सिंगल वर्क) ठेकेदाराने निविदा प्रसिध्दीपूर्वी ३ वर्षाचे कालावधीत म्हणजे १ एप्रिल २००७ पासून ते निविदा सादर करण्याच्या दिनांकापर्यंत समाधानकारक पूर्ण केल्याचे शासकीय/निमशासकीय सक्षम अधिकार्याच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
६. मागील ३ वर्षांची सरासरी वार्षिक उलाढाल ही कामाच्या रक्कमेच्या ७५% किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
जाहिरात क्र. ६८/२०१०
सुहास दिवसे
मुख्य कार्यकारी अधिकारी
No comments:
Post a Comment